अजिंक्य शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात,विद्यार्थी, पालक नागरिकांचा मोठा प्रतिसाद

फोटो – अजिंक्यच्या स्नेहसंमेलंनप्रसंगी कला प्रकार सादर करतान विद्यार्थी.

एन.डी.नलवडे
वाशी,दि.१२(संपादक): येथील अजिंक्य प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरच्या दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शाळेच्या प्रागणात ता.नऊ व दहा रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक सादरीकरण केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैरवनाथ शुगर्स वर्क्सचे व्हा.चेअरमन केशव सावंत होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी सोमनाथ घोलप, प्रियांकाताई प्रशांत चेडे, गटनेते नागनाथ नाईकवाडी, विस्तार अधिकारी विद्या टेकाळे, केंद्रप्रमुख कैलास चौधरी,शाळेचे सचिव एस. एल. पवार उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी तिसरी ते नववीतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  नगरपंचायतीच्या नगरसेविका वंदनाताई कवडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काकासाहेब मोरे, नगरसेवक भागवतराव कवडे, विकास मोळवणे, डॉ. बालाजी पाटील, नीलम गपाट तसेच विविध गावांतील सरपंच व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रियांकाताई चेडे, सोमनाथ घोलप आणि वंदनाताई कवडे यांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अजिंक्य परिवार करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी शाळेचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार पल्लवी क्षीरसागर व सुशीला गरड यांना प्रदान करण्यात आला. तसेच सैनिक स्कूलमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
स्नेहसंम्मेलनात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या नाटिकेमुळे अनेक प्रेक्षक भावुक झाले. इंदुरीकर रिमिक्स, श्रीविठ्ठल, भारुडे, देशभक्तीपर गीते आणि जुनी गीते यांमधून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. ‘बेटी’, ‘सावित्रीच्या लेकी’ आणि ‘मोबाईल बुरी बला’ या विषयांवरून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
सूत्रसंचालन पाचवीतील विद्यार्थी, शिक्षिका पल्लवी क्षीरसागर, सारिका जगताप,अश्विनी भांडवले यांनी केले. आभार दिपिका सौताडेकर,श्रीमती नाईकवाडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव एस. एल. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक एल. एस. पवार, एम.एन.माने
यांच्यासहा अजिंक्यच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

error: Content is protected !!