कौशल्याच्या बळावर विद्यार्थी बनतील रोजगार निर्माते, कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात विस्तार केंद्र व अळिंबी लागवड प्रयोगशाळेचे उद्घाटन

फोटो – विस्तार केंद्र व अळिंबी लागवड प्रयोगशाळेच्या उदघाटण प्रसंगी उपस्थीत मान्यवर. वाशी, दि. १ (प्रतिनिधी) : पदवीचे प्रमाणपत्र घेऊन नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा शिक्षणासोबतच कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे न बनता ज्ञान व कौशल्याच्या बळावर स्वयंरोजगार उभारून इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब … Read more

छत्रपती शिवाजी विद्यालयात १६५ विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप सेवा सहयोग फाउंडेशन व आय के एस हेल्थ कंपनीचा स्तुत्य उपक्रम

फोटो – विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थीत मान्यवर. वाशी,दि.१० (प्रतिनिधी) : येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात आय के एस हेल्थ कंपनी आणि सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवीतील विद्यार्थी तसेच शाळेच्या लक्ष्मीबाई जगदाळे मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना शनिवार दि.आठ रोजी एकूण १६५ स्कूल किटचे वाटप करण्यात आले. या किटची अंदाजे किंमत … Read more

छत्रपती शिवाजी विद्यालयाचे १४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र       कनक नलवडे हिने २१८ गुणासह मिळवला प्रथम क्रमांक

वाशी, दि. २८ (प्रतिनिधी) : येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित छत्रपती शिवाजी विद्यालयातील इयत्ता सातवीच्या १४ विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये पात्रता मिळविली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.या परीक्षेत कनक नलवडे हिने २१८ गुण मिळवत विद्यालयातुन प्रथम क्रमांक मिळवला आहे.माणस … Read more

छत्रपती शिवाजी विद्यालयातील  गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ७५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकांसह ट्रॉफी व प्रमाणपत्रांचे वितरण

फोटो  : गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात मान्यवरांसह सन्मानित विद्यार्थी. वाशी, दि. २८ (प्रतिनिधी) : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मंगळवारी (दि. २८) कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी  गुणवंत विद्यार्थ्यांचा ७५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकांसह ट्रॉफी व प्रमाणपत्र … Read more

शिष्यवृत्ती परीक्षेत अजिंक्य विद्यामंदिरचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

                                अर्णव भाकरे वाशी, दि. ४ (प्रतिनिधी) : फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, वाशी येथील अजिंक्य विद्यामंदिर शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी शहरी विभागातून शिष्यवृत्ती मिळवत शाळेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या परीक्षेत श्रीकांत प्रविण दळवे … Read more

हर्बल अँटीकोविड संशोधनासाठी सुमेध चव्हाण यांना पीएच.डी.

वाशी, दि. २४ (प्रतिनिधी) : विझोरा ता.वाशी येथील रहिवासी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील संशोधक डॉ. सुमेध सुनील चव्हाण यांनी हर्बल अँटीकोविड फॉर्म्युलेशन्सवरील संशोधन यशस्वीरित्या पूर्ण करून पीएच.डी पदवी संपादन केली आहे.“स्टडीज ऑन इफिकसी ऑफ सम हर्बल अँटीकोविड-१९ फॉर्म्युलेशन्स” या विषयावरील त्यांचे संशोधन वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. अरविंद धाबे … Read more

उन्हाळी सुट्टीतही शिक्षणाची ज्योत; सरमकुंडी शाळेत इंग्रजी-गणिताचे विशेष वर्ग ग्रामस्थांच्या लोकसहभागातून शाळेचे रूपडे पालटले; गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांचे विशेष प्रयत्न

फोटो  – सरमकुंडी ता.वाशी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा. वाशी, दि.१७ (बातमीदार) : शाळा बंद असली तरी शिक्षण थांबता कामा नये, या उद्देशाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सरमकुंडी ता. वाशी येथील शिक्षकांनी संपूर्ण उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व गणित विषयांचे विशेष वर्ग घेऊन शिक्षणाचा अनोखा उपक्रम राबविला. शिक्षकांच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीला … Read more

छत्रपती शिवाजी विद्यालयाचे इंडियन टॅलेंट ऑलिंपियाडमध्ये मोठे यश

फोटो : छत्रपती शिवाजी विद्यालयात ऑलिंपियाड परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना सुहास थोरबोले, बापुसाहेब सावंत, सुनील क्षीरसागर आदी. वाशी, दि. २३ (प्रतिनिधी) : येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलिंपियाड या आंतरराष्ट्रीय परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी १४ सुवर्ण, १० रौप्य आणि १० कांस्य अशी एकूण ३४ पदके पटकावत शाळेच्या नावलौकिकात … Read more

बालसंस्कारच्या विद्यार्थ्याचे राज्यस्तरिय मंथन परिक्षेत यश

फोटो – राज्यस्तरिय मंथन परिक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी. वाशी दि.२३(प्रतिनिधी) येथील बाल संस्कार प्राथमिक विद्यामंदीर शाळेतील विद्यार्थ्यानी जिल्हा व तालुका स्तरावर  मंथन परिक्षेत मोठे यश मिळवले असुन विद्यार्थ्यानी यश मिळवत शाळेच्या नाव लौकीकात भर टाकली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे सर्वञ कौतुक होत असुन गुरुवार (ता.२३) रोजी शाळेच्या वतीने विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.जिल्हा गुणवत्ताधारक विद्यार्थी – वैभवी शिंदे, … Read more

अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिरचे मंथन परीक्षेत मोठे यश

फोटो  – मंथन परिक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्याच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यासह  मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार व शिक्षक. ……………………………वाशी, दि.१९ (प्रतिनिधी): येथील अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यानी मंथन टॅलेंट सर्च परीक्षेत मोठे यश संपादन करत राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळेशाळेच्या नावलौकीकात भर पडली असुन विद्यार्थ्याचे सर्वञ कौतुक होत आहे.मंथध … Read more

error: Content is protected !!