
फोटो – आळिंबी लागवड कार्यशाळे प्रसंगी प्राचार्य डाँ.अशोक कदम,किसनराव खरवडे,प्रा.श्याम डोके आदी.
वाशी,दि.०२ (प्रतिनिधी): येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात वाशी मंगळवार (ता.एक)
वनस्पतीशास्त्र विभाग,गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आळिंबी लागवड’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात घेण्यात आली.कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक कदम होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसनराव खरवडे यांची उपस्थीती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज,कर्मवीर डाँ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पुजन करुण अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यशाळेचे समन्वयक प्रा. शाम सुंदर डोके यांच्यासह प्राध्यापक,प्राध्यापेकेतर कर्मचारी,विद्यार्थी पालक उपस्थीत होते.
कार्यक्रमप्रसंगी श्री खरवडे यांनी आळिंबी लागवड हा शेतीपूरक आणि कमी भांडवलात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय असल्याचे सांगितले. गव्हाच्या भुशासारख्या टाकाऊ पदार्थांचा कच्चा माल म्हणून प्रभावी वापर करता येतो, याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले. तसेच आळिंबी उत्पादन प्रक्रिया, त्याचे विपणन आणि आळिंबीतील पोषक मूल्ये याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा व्यवसाय अधिक परिणामकारक पद्धतीने करता येऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.कदम यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कौशल्याधारित आणि व्यवसायाभिमुख शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे नमूद केले. अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळून भविष्यात स्वावलंबी होण्यास मदत होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेदरम्यान सोहेल शेख आणि आरती वाघमोडे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त करताना कार्यशाळेतील माहिती उपयुक्त व प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शाम सुंदर डोके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. पार्थराज क्षीरसागर यांनी केले, तर प्रा. डॉ. बलवान कांबळे यांनी आभार मानले.
………….
कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा निर्माण होऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याचे कार्यशाळेस उपस्थीत काही विद्यार्थ्यानी सांगीतले.