आ.प्रा.डाँ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; ३०० हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

फोटो – आ.प्रा.डाँ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत रक्तदान शिबिर प्रसंगी केशव सावंत, विकी चव्हाण,नागनाथ नाईकवाडी,सतिश शेरकर आदी.

एन.डी.नलवडे

वाशी,ता.१८ (संपादक) : माजी मंत्री आ.प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त तेरखेडा (ता. वाशी) येथे सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते विकी चव्हाण यांच्या पुढाकारातून तसेच भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हा. चेअरमन केशव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता. १८) हे शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात ३०० पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपली.
रक्तदान हे केवळ दान नसून अनेक रुग्णांसाठी जीवनदान ठरते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया रुग्ण, तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना रक्ताची नितांत गरज असते. अशा वेळी रक्तदाते पुढे येणे ही समाजासाठी मोठी मदत ठरते. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाला प्रतिसाद देत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
याप्रसंगी भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हा.चेअरमन केशव सावंत,जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण, वाशी नगर पंचायत गटनेते नागनाथ नाईकवाडी, उद्योजक बालाजी घोलप,विठ्ठल चौधरी, सरपंच सुनिल जाधवर, सुनिल उंदरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच युवासेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, पंचायत समितीचे उपसभापती नितिन रणदिवे, युवासेना तालुका प्रमुख प्रवीण गायकवाड, शहरप्रमुख सतीश शेरकर, उद्धव साळवी, दत्तात्रय तोडकर, अक्षय चव्हाण, मुन्ना मनगिरे, बबन कात्रे, बालाजी हलगरे, कृष्णा कदम, राहुल आडमुठे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयोजकांनी रक्तदात्यांचे आभार मानत, अशा उपक्रमांमुळे समाजात जागरूकता वाढून अधिकाधिक लोक रक्तदानासाठी पुढे येतील, असा विश्वास व्यक्त केला. या शिबिरातून वाढदिवस साजरा करण्याची एक सकारात्मक व प्रेरणादायी परंपरा निर्माण होत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!