दोन दिवसीय धाराशिव ग्रंथोत्सवास प्रारंभ.अजिंक्य विद्यामंदिरच्या प्रांगणात ग्रंथ प्रदर्शन व विक्री

ग्रंथ दिंडीत सहभागी विद्यार्थी.

ग्रथोत्सव उदघाटण प्रसंगी मार्गदर्शन करताना अशोक गाडेकर.

संपादक – एन.डी.नलवडे
वाशी : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धाराशिव व तालुका ग्रंथालय समिती, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय “धाराशिव ग्रंथोत्सव”ची आज वाशी येथे उत्साहात सुरुवात झाली. येथील अजिंक्य विद्या मंदिरच्या प्रांगणात आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ग्रंथालय संचालनालय, मुंबईचे संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते झाले.
सकाळी ग्रंथपूजनानंतर शहरातून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. दिंडीत विविध शाळांतील विद्यार्थी, बालवारकरी, लेझीम, टिपरी व जहाज पथकांच्या तालबद्ध सादरीकरणामुळे वातावरण भारावले. टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा-तुकाराम जयघोषांनी शहर भक्तिभावात न्हाऊन निघाले. विद्यार्थ्यांनी विविध महामानवांच्या वेशभूषेत सहभाग नोंदवून वाचन संस्कृतीचा संदेश दिला.
उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना मान्यवरांनी ग्रंथवाचनाची गरज अधोरेखित केली. दुपारच्या सत्रात “वाचन संस्कृती आणि आजची स्थिती” या विषयावर परिसंवाद झाला, तर कथाकथन व विद्यार्थ्यांच्या गुणदर्शन कार्यक्रमांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रांगणात उभारलेल्या आठ स्टॉलमधून दिवसभर ग्रंथप्रदर्शन व विक्री सुरू होती; नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पुस्तके खरेदी केली.
पुस्तके खरेदीचे आवाहन
ग्रंथालयांना मिळालेल्या निधीपैकी २५ टक्के रकमेची पुस्तके या ग्रंथोत्सवातून खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ग्रंथालय व चालकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

error: Content is protected !!