
एन.डी.नलवडे
वाशी,ता.१२ (संपादक) – महाशिवरात्रीच्या निमित्ताने माणकेश्वर येथील श्री क्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिरात मराठ्यांचे ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन आणि भव्य दीपोत्सव, मशाल यात्रा श्री क्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिर, माणकेश्वर, ता. भूम येथे श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठाण भुम तालुका व माणकेश्वर ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजीत करण्यात आले आहे.

गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता शस्त्रप्रदर्शनाचा प्रारभ झाला असुन महाशिवरात्रीच्या रात्री रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ७ वाजता भव्य दीपोत्सव, मशाल यात्रा आणि महाआरती आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यातील मावळ्यांनी मराठेशाहीचा इतिहास घडविण्यासाठी वापरलेली शिवकालिन शस्त्रे प्रदर्शित केली जातील. यामुळे इतिहासप्रेमी आणि विद्यार्थ्यांना मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची थेट झलक अनुभवता येणार आहे.
शस्त्रप्रदर्शनाचे मार्गदर्शन श्री माधवराव देशमुख, जागतिक शस्त्रसंग्रालय, बार्शी यांच्या मार्गदर्शनाखाली होईल.
हा कार्यक्रम श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान, भूम तालुका आणि समस्त माणकेश्वर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
भूम तालुका आणि माणकेश्वर परिसरातील सर्व इतिहासप्रेमींनी हा ऐतिहासिक अनुभव अनुभवावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.