सटवाईवाडीत दुर्मीळ घटना; एका गायीने दिला चार वासरांना जन्म.

वाशी, ता. ११ (प्रतिनिधी): सटवाईवाडी (ता. वाशी) येथे परिसरात कधीही न घडलेली दुर्मीळ घटना समोर आली आहे. माजी सैनिक तथा शेतकरी सुरेश फरताडे यांच्या गायीने रविवारी रात्री सुमारे आठच्या सुमारास एकाच वेळी चार वासरांना जन्म दिला. विशेष म्हणजे गाय व चारही वासरे सुखरूप आहेत. या प्रसूतीत दोन कालवडी व दोन गोरे जन्माला आले असून, अशी घटना परिसरात प्रथमच घडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सटवाईवाडी ता.वाशी येथील शेतकरी सुरेश फरताडे हे सांभाळत असलेल्या गायीचे चार नवजात वासरे.

Leave a Comment

error: Content is protected !!