हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारी इफ्तार पार्टी उत्साहात संपन,गटनेते विकी चव्हाण यांची उपस्थीती

फोटो: विकी चव्हाण यांनी सय्यदशहा अब्दाल यांच्या दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी नागनाथ नाईकवाडी शिवहार स्वामी,सुनिल उंदरे,प्रविण गायकवाड यांच्यासह हिंदू-मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते.


वाशी, ता. १८ (प्रतिनिधी): हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या येथील हजरत सय्यदशहा अब्दाल यांच्या दर्ग्यात रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त माजी मंत्री आ. प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी मंगळवारी (दि. १७) इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास धाराशिव जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते विकी चव्हाण, नगर पंचायत गटनेते नागनाथ नाईकवाडी, सरपंच सुनील उंदरे, युवासेना तालुका प्रमुख प्रवीण गायकवाड, पंचायत समितीचे उपसभापती नितीन रणदिवे, पं.स. सदस्य अशोक भराटे, नगरसेवक शिवहर स्वामी, शहरप्रमुख सतीश शेरकर, युवासेना शहरप्रमुख प्रकाश शेटे, लायक तांबोळी, राहुल आडमुटे, माऊली देशमुख, अखिल कुरेशी, शमशोद्दीन लोहार, गालिब मुजावर, बाबू काझी, बाबा कुरेशी, मकसूद मुनियार, युवराज येडे, हर्षल उंदरे, सुरज उंदरे, सुरज नाईकवाडी, नितीन सुकाळे यांच्यासह हिंदू-मुस्लिम समाजातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रमजान महिन्याच्या निमित्ताने आयोजित या इफ्तार कार्यक्रमातून समाजातील ऐक्य, बंधुता आणि सौहार्द वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले तसेच एकोप्याचा संदेश समाजात रुजवण्याचे आवाहन केले.

Leave a Comment

error: Content is protected !!