३६ वर्षांची सेवा पूर्ण; सत्यभामा तौर यांचा भावनिक निरोप समारंभ उत्साहात

फोटो  – सत्यभामा तौर यांचा निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी सत्कार करण्यात आला.यावेळी जयकुमार शितोळे,सोमनाथ घोलप,सुहास थोरबोले,संतोष माने आदी.


वाशी,दि.०१ (प्रतिनिधी): येथील बालसंस्कार प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील सहशिक्षिका सत्यभामा माधवराव तौर या वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या असून, त्यांच्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेला मानाचा मुजरा करत सोमवार ता.३० रोजी बालसंस्कार विद्यामंदिरात सेवापूर्ती सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार तथा शाळा समितीचे अध्यक्ष जयकुमार शितोळे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी
सोमनाथ घोलप, शिक्षण विस्तार अधिकारी विद्युलता टेकाळे,पी.बी.लोखंडे,मुख्याध्यापक संतोष माने, डॉ. प्रमोद शिंदे, आर्किटेक्ट सुशांत जगदाळे,छञपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास थोरबोले, डी.के.घुमरे, डॉ.रुपेशकुमार जावळे, रमेश पवार महादेव उकरंडे आदी उपस्थित होते.
निरोप समारंभात विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आठवणी जागवल्या. तर उपस्थीत मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
कार्यक्रम प्रसंगी सत्यभामा तौर यांनी शाळेसाठी पाच फॅन
व संस्थेस ५१ हजार रुपयाचा धनादेश देणगी म्हणून दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अलका कुंभार यांनी केले, तर आभार उत्तम कावरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनिषा कवडे, यशोदा कारंडे, दामिनी देसाई, प्रशांत कदम यांनी परिश्रम घेतले.निरोप समारंभ कार्यक्रमास कर्मवीर बालमंदिर शाळेचा स्टाफ, पालक,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!