

वाशी जि.धाराशिव – निलंगा येथे शिवकालीन पराक्रमाची साक्ष देणारी दुर्मिळ शस्त्रे आणि ऐतिहासिक वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. संग्रहक माधवराव उत्तमराव देशमुख यांच्या संग्रहील वाघनखे, दांडपट्टा तसेच अनेक ऐतिहासिक वस्तू इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.
विद्यार्थी, संशोधक आणि शिवभक्तांसाठी हा उपक्रम प्रत्यक्ष इतिहास अनुभवण्याची सुवर्णसंधी ठरणार असून शिवकालीन शौर्याचा थरार अनुभवण्याची दुर्मीळ संधी उपलब्ध होणार आहे.
ठिकाण: राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चौक, निलंगा
️ तारीख: १८ ते १९ फेब्रुवारी २०२६
वेळ: सकाळी १० ते रात्री ९
आयोजक: दत्ता मल्लिकार्जुन मोहोळकर
ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सहकुटुंब उपस्थित राहून शिवकालीन इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच माहितीपूर्ण व प्रेरणादायी अपडेट्ससाठी
लोकनीती पेजला
लाईक करा | शेअर करा | कमेंट करा | फॉलो करा

