७२ लाख ८४ हजाराची अफुची झाडे जप्त,वाशी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी संयुक्त कारवाई.

अवैध अफू लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई अंदाजे ७२.८४ लाख मुल्य.
………….

दसमेगाव ता.वाशी येथे अफुची झाडे जप्त करण्यात आली.यावेळी पोलीस पथक.

एन.डी.नलवडे
वाशी,ता.१२ (संपादक):  बुधवार ता. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी तालुक्यातील दशमेगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध अफू लागवडी विरोधात धडक कारवाई केली.
याबाबत पोलीसांकडुण मिळालेल्या माहितीनुसार  गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधिक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी सदर कारवाई केली.
संबंधित शिवारातील सर्वे क्र. १६३ येथे ताब्यात घेतलेल्या अफूच्या झाडांचे एकूण वजन ४८५.६५ किलो असून, झाडांवर पांढरी–गुलाबी फुले आणि मोठी बोंडे आढळली.
जप्त केलेल्या अफूच्या झाडांचे बाजारभावानुसार अंदाजे मुल्य ७२ लाख ८४ हजार ७५० रुपये  इतके आहे.पोलीस पथकाने अफूची झाडे जप्त केली असुन संबधीताविरोधात वाशी पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोकर, मा.अप्पर पोलीस अधिक्षक शफकत आमना मॅडम ,
मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक विनोद ईज्जपवार,पोलीस निरिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक सुदर्शन कासार,सहाय्यक पोलीस निरिक्षक यशवंत घोडके , अंमलदार  शौकत पठान , जावेद काझी , कपील बोरकर , दत्तात्रय राठोड,दयानंद गादेकर,गणेश खैरे , श्रीनिवास घुले , विकास जगताप, ज्योती बहीरवाल
पो.नि अशोक ढगारे,सुभाष चौरे,नागनाथ गुरव, जगताप, मिसाळ, खैरे,घुले यांच्या संयुक्त पथकाने केली .

सोबत व्हिडिओ

अवैद्य अफू लागवडी विरोधात कारवाई प्रसंगी पोलीस पथक

Leave a Comment

error: Content is protected !!