
फोटो – विज्ञान मंडळाचे उद्घाटनप्रसंगी प्रा.डाँ.व्ही.एम.गुरमे,प्राचार्य डाँ.अशोक कदम,प्रा.डाँ.रविंद्र कठारे,प्रा.राजाभाऊ बनसोडे,प्रा.शाम डोके,प्रा.डाँ.विश्वास चौधरी,प्रा.अजित तिकटे आदी.
वाशी,ता.०४ (प्रतिनिधी): येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात बुधवार (ता.चार), रोजी विज्ञान मंडळाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. व्ही.एम.गुरमे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक कदम होते.
यावेळी विज्ञान मंडळाचे संयोजक प्रा. राजाभाऊ बनसोडे,प्रा.डाँ.रविंद्र कठारे,प्रा.शाम डोके,प्रा.डाँ.विश्वास चौधरी,प्रा.डाँ.पार्थराज क्षिरसागर,प्रा.डाँ.नेताजी देसाई,प्रा.अजित तिकटे आदिंची उपस्थीती होती.
कार्यक्रम प्रसंगी प्रा. डॉ. गुरमे यांनी मार्गदर्शन करताना, “पदवीधर झाल्यानंतर तुम्हाला पंख मिळतात; त्यानंतर तुमचे आकाश तुम्हीच निवडायचे असते,” असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना दिला. विज्ञानाचे आजच्या युगातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत त्यांनी तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवा, शेती, अंतराळ, संवादव्यवस्था आणि शिक्षण या सर्वच क्षेत्रांत विज्ञानामुळे प्रगतीची नवी क्षितिजे खुली झाली असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड, कुतूहल आणि शोधक वृत्ती विकसित व्हावी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा, या उद्देशाने विज्ञान मंडळाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य डॉ. अशोक कदम यांनी, विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, भारतीय शास्त्रज्ञांची माहिती देणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. प्रदर्शन व मार्गदर्शन सत्रांमुळे विद्यार्थ्यांना नवे विचार आणि संशोधनाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विज्ञान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विश्वास चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ.पार्थराज क्षीरसागर यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. नेताजी देसाई यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापेकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
