आ. प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात;तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पुण्यात सत्कार

फोटो – वाढदिवसानिमित्त आ.प्रा.डाँ.तानाजी सावंत यांचा सत्कार करताना शिवसेनेचे जि.प.गटनेते विकी चव्हाण.व उपस्थीत पदाधिकारी कार्यकर्ते. एन.डी.नलवडे वाशी, दि.१६ (संपादक): माजी मंत्री व भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा वाढदिवस रविवारी (ता.१५) तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. अनेक ठिकाणी रुग्णांना फळे वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच लहान मुलांना … Read more

कार्यकर्त्याला मोठ्या पदावर नेण्याची कला असलेले व्यक्तिमत्त्व : प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

वाशी, दि.१४ (प्रतिनिधी) : सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना नेतृत्वाच्या पातळीपर्यंत घेऊन जाण्याची परंपरा शिवसेनेची राहिली असून हीच परंपरा माजी आरोग्यमंत्री तथा वाशी-भूम-परांडा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत पुढे नेत असल्याचे मत धाराशिव जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते संदेश उर्फ विकी चव्हाण यांनी व्यक्त केले.शिवसेना ही स्थापनेपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात … Read more

वाशी पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा; प्रणिता गायकवाड सभापती, नितिन रणदिवे उपसभापतीपदी

फोटो – सभापती,उपसभापती निवडीनतंर शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवसेनेचे नुतन पं.स.सदस्य. वाशी,दि.०६ (प्रतिनिधी) : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या प्रणिता प्रविण गायकवाड यांची तर उपसभापतीपदी नितिन रणदिवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवार (ता. ६) रोजी पंचायत समिती सभागृहात  पिठासन अधिकारी, तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मध्यम प्रकल्प क्र.२, धाराशिव संतोष राऊतयांच्या उपस्थितीत सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया … Read more

आ.प्रा.डाँ.सावंत यांच्या नेतृत्वाला मतदारांचा कौल; पारा जि.प. गटात शिवसेनेचा विजय,नुतन जि.प.सदस्य आश्विनी उंदरे यांचा आ.सावंत यांच्या हस्ते सत्कार.

वाशी,ता.१२ (प्रतिनिधी) पारा जि.प. गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या आश्विनी सुनिल उंदरे यांचा माजी सार्वजनिक कुटुंब व आरोग्य मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी बुधवारी (ता.११) पुणे येथे सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी वाशी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना गटनेते नागनाथ नाईकवाडी, भूम नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, बाळासाहेब हाडोग्रीकर, शिवसेना तालुका संघटक … Read more

तालुक्यावर शिवसेनेचा ठसा; जि.प.–पं.स. निवडणुकीत एकहाती सत्ता

वाशी (प्रतिनिधी):तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राजकीय चित्र पूर्णतः बदलले असून, शिवसेनेने या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्हा परिषदेच्या तिन्ही गटांवर शिवसेनेचा भगवा फडकला, तर पंचायत समितीतील सहा गणांपैकी पाच गण शिवसेनेच्या ताब्यात गेल्याने विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.जिल्हा परिषद पारगाव गटात शिवसेनेच्या सविता विकास तळेकर … Read more

error: Content is protected !!