
वाशी,दि.१९ (प्रतिनिधी) : गोवंश जनावरांची क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने व निर्दयीपणे वाहतूक करत कत्तलीसाठी नेत असल्याप्रकरणी एका विरोधात वाशी पोलिसात स्थानिक गुन्हे शाखेचे दयानंद गादेकर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे बुधवार ता.१८ रोजी रात्री १० वाजणेच्या सुमारास फक्राबाद ता.वाशी येथील मुख्य चौकातुण बबन घोडे वय ३७, रा. भोनगीरी, ता. भूम हा पांढऱ्या रंगाचे अशोक लिलँड दोस्त कंपनीचे वाहन क्र. एम.एच २५ एजे ८१७२ मधुन चार गोवंश जातीची जनावरे कमी रुंदीच्या जागेत हालचाल न होईल अशा स्थितीत कोंबून ठेवलेली आढळून आली. जप्त मालामध्ये अंदाजे ७ लाख रुपये किंमतीचे वाहन, एक पांढरा बैल (५५ हजार), एक तांबूस बैल (४० हजार) व दोन जर्सी गायी (४० हजार व ४५ हजार) असा एकूण सुमारे ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्दे माल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार बळीराम यादव हे करत आहेत.