राष्ट्रवादीचे संतोष पवार यांची शिवसेनेत ‘एन्ट्री’;माजी मंत्री,आमदार प्रा.डाँ.तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश.

फोटो : पुणे येथे माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत संतोष पवार यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वाशी, दि. २९ (प्रतिनिधी) : तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी घडामोड बुधवारी ता.२९ घडली. माजी आ. राहुल मोटे यांचे विश्वासू सहकारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संतोष पवार यांनी … Read more

छत्रपती शिवाजी विद्यालयातील  गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ७५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकांसह ट्रॉफी व प्रमाणपत्रांचे वितरण

फोटो  : गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात मान्यवरांसह सन्मानित विद्यार्थी. वाशी, दि. २८ (प्रतिनिधी) : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मंगळवारी (दि. २८) कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी  गुणवंत विद्यार्थ्यांचा ७५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकांसह ट्रॉफी व प्रमाणपत्र … Read more

अपूर्ण डिव्हायडर ठरत आहे अपघाताला निमञण; सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार कधी?

फोटो ओळ  – अपूर्ण डिव्हायडरमुळे रस्ता ओलांडताना घसरून झालेले दुचाकी अपघात. वाशी, दि. २२ (प्रतिनिधी) : वाशी फाटा ते शहर या मुख्य मार्गावरील माऊली पेट्रोल पंप ते अजित पेट्रोल पंपदरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरचे काम आजही अपूर्ण असून, हा डिव्हायडर आता वाहनचालकांसाठी अक्षरशः अपघाताला निमञण ठरत आहे. … Read more

प्रा. डॉ. रविंद्र कठारे (सर): तत्त्वांचा दीपस्तंभ

                   प्रा. डॉ. रविंद्र कठारे (सर) काही व्यक्ती पदावर असताना मोठ्या वाटतात; परंतु काही व्यक्ती पद सोडल्यानंतरही अधिक उंच भासतात. कारण त्यांची उंची पदामुळे नसते, तर त्यांच्या विचारांमुळे, मूल्यांमुळे आणि त्यांनी घडवलेल्या माणसांमुळे असते. प्रा. डॉ. रविंद्र कठारे हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहेत.ते येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातुन ३० जुन रोजी सेवानिवृत्त होत आहेत.ज्ञानदान हे … Read more

३३ वर्षांनंतर रंगला १९९३ च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा शिक्षक-विद्यार्थ्यांचा भावनिक पुनर्मिलाप; स्मरणिकेचे प्रकाशन, ट्रॉफी वितरणाने सोहळ्याला रंगत

फोटो  – १९९३ बँचच्या स्नेह मेळाव्यात सहभागी झालेले माजी विद्यार्थी. एन.डी.नलवडेवाशी,दि.१९ (संपादक) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातून सन १९९३ साली इयत्ता दहावीचे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ३३ वर्षांनंतर स्नेहमेळावा रविवार ता.१७ उत्साहात शहरातील अन्नपुर्णा मंगल कार्यालयात पार पडला. स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थी व तत्कालीन शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सुमारे तीन दशकांनंतर एकमेकांना भेटण्याचा योग आल्याने उपस्थितांमध्ये … Read more

डायल ११२ चा गैरवापर महागात; वाशी पोलिसांची तात्काळ कारवाई, एकाला ताब्यात

वाशी,दि. २४ (प्रतिनिधी): आपत्कालीन मदतीसाठी सुरू असलेल्या डायल ११२ सेवेचा गैरवापर करणाऱ्या एका व्यक्तीवर वाशी पोलिसांनी कठोर कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे आपत्कालीन सेवांचा गैरवापर किती गंभीर ठरू शकतो, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (ता. २४) रोजी दुपारी सुमारे ३:३८ वाजता कंट्रोल रूमकडून वाशी तालुक्यातील नांदगाव येथे एका … Read more

जगदाळे महाविद्यालयात रोजगार क्षमता विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

फोटो : रोजगार क्षमता विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मनीषा आडागळे, डॉ. अशोक कदम, डॉ. विश्वास चौधरी, डॉ. महेश गुरमे, डॉ. बालाजी देवकते आदी उपस्थित. वाशी, दि. २५ (प्रतिनिधी) : कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय येथे प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित तीन दिवसीय रोजगार क्षमता विकास कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन पुणे येथील नांदी फाउंडेशनच्या मनीषा आडागळे … Read more

छञपती शिवाजी विद्यालयाच्या ३० विद्यार्थ्याचे एनएमएमएस परिक्षेत यश

वाशी,दि.२५ (प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या एकुण ३० विद्यार्थ्यानी एनएमएमएस परिक्षेत यश मिळवुण शाळेच्या नावलौकीकात भर टाकली आहे.या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.एनएमएमएस परिक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी व मिळालेले गुण पुढील प्रमाणे श्रावनी शेळके १३१,सेजल भांडवले १२९,संस्कृती आडमुटे ११९, अजिंक्य कागदे १०९, अपुर्वा कुंभार १०९, नंदीनी चौधरी … Read more

प्रा. कुंडलिक गुंड यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. पदवी

वाशी,दि.२४ (प्रतिनिधी) : कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात कार्यरत इंग्रजी विषयाचे प्रा. कुंडलिक गुंड यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली आहे.प्रा. गुंड हे गेल्या पंचवीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत असून त्यांनी “क्रिटिकल अ‍ॅनालिसिस ऑफ द मेल कॅरेक्टर्स इन द सिलेक्टेड नॉवेल्स ऑफ अनिता ब्रुकनर” या विषयावर संशोधन प्रबंध … Read more

सरकारी नोकरीचे आमिष;११ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक, चौघांवर गुन्हा

वाशी,दि.२४ (प्रतिनिधी) : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवुण सहा जाणांची एकुण ११ लाख  ८५ हजार रुपयाची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असुनमंगळवार (ता.२४) रोजी बाळासाहेब पंडितराव सुकाळे यांच्या फिर्यादीवरुन चौघा विरोधात वाशी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी रईसोद्दीन (नबाब) हमीद काझी रा.वाशी यांनी व संदीप चंद्रकांत चांदीएकर, स्वप्निल मोरे व … Read more

error: Content is protected !!