प्रा. कुंडलिक गुंड यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. पदवी

प्रा.डाँ.कुंडलिक गुंड

वाशी,दि.२४ (प्रतिनिधी) : कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात कार्यरत इंग्रजी विषयाचे प्रा. कुंडलिक गुंड यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली आहे.
प्रा. गुंड हे गेल्या पंचवीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत असून त्यांनी “क्रिटिकल अ‍ॅनालिसिस ऑफ द मेल कॅरेक्टर्स इन द सिलेक्टेड नॉवेल्स ऑफ अनिता ब्रुकनर” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. त्यांच्या या प्रबंधास विद्यापीठाच्या निवड समितीने मान्यता दिली आहे.
त्यांना या संशोधन कार्यासाठी श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, बार्शी येथील प्रा. डॉ.विजयकुमार वाघमारे यांचे मार्गदर्शन मिळाले.
प्रा.गुंड यांना शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च मानाची पीएच.डी. पदवी मिळाल्याबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष मा. नंदनजी जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम, यांच्यासह प्राध्यापक,प्राध्यापेकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!