
फोटो : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थीत मान्यवर.
वाशी, दि.१९ (प्रतिनिधी) : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव कमेटीच्या वतीने गुरुवारी (ता.१९) शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार विद्या राठोड, शिवसेना नेते (उबाठा) प्रशांत चेडे, नगराध्यक्षा विजयाबाई गायकवाड, उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, ज्येष्ठ नेते मच्छिंद्र कवडे, माजी नगराध्यक्ष नितीन चेडे, गटनेते नागनाथ नाईकवाडी, नगरसेवक कृष्णा गवारे, श्रीकृष्ण कवडे, शिवहार स्वामी, विकास पवार, संतोष गायकवाड, विकास मोळवणे, संतोष पवार, सतीश शेरकर, अॅड. सूर्यकांत सांडसे, सुहास कवडे, दादासाहेब चेडे, संतोष कवडे, बाळासाहेब सुकाळे, शिवाजी उंदरे, प्रशांत कवडे, अभिजीत जगताप, संदीप हुंबे, संभाजी भांडवले, विठ्ठल कवडे, किरण पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. समतानगर येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला.शहरातील प्रमुख मार्गावरुन
ही मिरवणूक पार पडली. उंट व घोड्यांवर विविध ऐतिहासिक वेशभूषेत बसलेल्या बालकांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत आबालवृद्धांसह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महोत्सव कमेटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरिकांनी परिश्रम घेतले.