धाराशिव–बीड राष्ट्रीय महामार्गावर दिवसा पवनचक्कीच्या अवजड पात्यांची वाहतूक; नागरिकांकडून निर्बंधांची मागणी

फोटो : राष्ट्रीय महामार्गावर दिवसा पवनचक्कीच्या पात्याची वाहतूक होत असताना. वाशी, दि.२७ (प्रतिनिधी) : धाराशिव–बीड राष्ट्रीय महामार्गावर सध्या पवनचक्की प्रकल्पांसाठी लागणाऱ्या अवजड पात्यांची (ब्लेड) दिवसा वाहतूक होत असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याची चिंता नागरिक व वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.प्रचंड लांबी व रुंदीची ही पाते दिवसा वाहून नेली जात असल्याने महामार्गावरील वाहतुकीत अडथळे निर्माण … Read more

जगदाळे महाविद्यालयात रोजगार क्षमता विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

फोटो : रोजगार क्षमता विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मनीषा आडागळे, डॉ. अशोक कदम, डॉ. विश्वास चौधरी, डॉ. महेश गुरमे, डॉ. बालाजी देवकते आदी उपस्थित. वाशी, दि. २५ (प्रतिनिधी) : कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय येथे प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित तीन दिवसीय रोजगार क्षमता विकास कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन पुणे येथील नांदी फाउंडेशनच्या मनीषा आडागळे … Read more

तेरखेडा येथे एनडीआरएफ-एसडीआरएफ कडून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण; २०० हून अधिक कामगारांचा सहभाग

फोटो ओळ – नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण प्रसंगीतहसिलदार प्रकाश म्हेञे,एनडीआरएफ-एसडीआरएफचे अधिकारी,जवान व कारखानदार,कामगार आदी. वाशी,दि.२५ (प्रतिनिधी) तेरखेडा ता.वाशी येथील प्रिन्स फायर वर्क्स कारखान्याच्या परिसरात बुधवार (ता.२५)नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. एनडीआरएफ पुणे व एसडीआरएफ धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रकाश म्हेत्रे होते. प्रमुख पाहुणे म्हणून एनडीआरएफ पुणेचे … Read more

छञपती शिवाजी विद्यालयाच्या ३० विद्यार्थ्याचे एनएमएमएस परिक्षेत यश

वाशी,दि.२५ (प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या एकुण ३० विद्यार्थ्यानी एनएमएमएस परिक्षेत यश मिळवुण शाळेच्या नावलौकीकात भर टाकली आहे.या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.एनएमएमएस परिक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी व मिळालेले गुण पुढील प्रमाणे श्रावनी शेळके १३१,सेजल भांडवले १२९,संस्कृती आडमुटे ११९, अजिंक्य कागदे १०९, अपुर्वा कुंभार १०९, नंदीनी चौधरी … Read more

नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारीसाठी जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

वाशी,दि.२४ (प्रतिनिधी): सन २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित, पशुधन व वित्तीय हानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत व्यापक जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींच्या अनुषंगाने नियोजन, पूर्वतयारी, उपाययोजना व बचावकार्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांच्या सहभागातून हे प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार २५ … Read more

प्रा. कुंडलिक गुंड यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. पदवी

वाशी,दि.२४ (प्रतिनिधी) : कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात कार्यरत इंग्रजी विषयाचे प्रा. कुंडलिक गुंड यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली आहे.प्रा. गुंड हे गेल्या पंचवीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत असून त्यांनी “क्रिटिकल अ‍ॅनालिसिस ऑफ द मेल कॅरेक्टर्स इन द सिलेक्टेड नॉवेल्स ऑफ अनिता ब्रुकनर” या विषयावर संशोधन प्रबंध … Read more

सरकारी नोकरीचे आमिष;११ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक, चौघांवर गुन्हा

वाशी,दि.२४ (प्रतिनिधी) : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवुण सहा जाणांची एकुण ११ लाख  ८५ हजार रुपयाची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असुनमंगळवार (ता.२४) रोजी बाळासाहेब पंडितराव सुकाळे यांच्या फिर्यादीवरुन चौघा विरोधात वाशी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी रईसोद्दीन (नबाब) हमीद काझी रा.वाशी यांनी व संदीप चंद्रकांत चांदीएकर, स्वप्निल मोरे व … Read more

साखरपुड्यानंतर आठवड्यातच दुर्दैवी घटना : कार टोलवे कमानीला धडकून तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

वाशी, दि. २२ (प्रतिनिधी) : आठ दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या तरुण-तरुणीचा सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रत्नापूर पाटीजवळील वळणावर कारने टोलवे कमानीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (ता. २२) सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय नामदेव शिनगारे (वय २५) व … Read more

अंकुरम विद्यामंदिरचा “अंकुरोत्सव २०२६” वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

फोटो – अंकुरम विद्या मंदिरच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सादर करण्यात आलेल्या ऐतिहासिक नाट्यप्रसंगात विद्यार्थ्यांचा आकर्षक वेशभूषेसह दमदार अभिनय. एन.डी.नलवडेवाशी,दि.२१ (संपादक) येथील अंकुरम विद्यामंदिर येथे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम “अंकुरोत्सव २०२६” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.अशोक कदम यांची उपस्थीती होती.यावेळी  श्रीरामपुर येथील प्रगतशील शेतकरी शेषराव पवार,बारामती येथील कॉलेज ऑफ फार्मसी उपप्राचार्य प्रा.राजेंद्र बांदल,प्रा.श्रीकांत … Read more

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाला ‘A+’ मानांकन

एन.डी.नलवडेवाशी, दि. २० (संपादक) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत झालेल्या बाह्य मूल्यांकनात येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाला ‘A+’ मानांकन प्राप्त झाले आहे. या यशामुळे ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये महाविद्यालयाचा लौकिक अधिकच वृद्धिंगत झाला आहे.सदरच्या मानांकनासाठी … Read more

error: Content is protected !!