भारतीय किसान संघ कृषी अभ्यासवर्गात आधुनिक तंत्रज्ञानावर भर; पद्मश्री डॉ. दादा लाड यांचा सत्कार

वाशी, ता.१९ (प्रतिनिधी) : भारतीय किसान संघ, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने बार्शी नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात बुधवारी (ता.१८) शेतकरी बांधवांसाठी एकदिवसीय कृषी अभ्यासवर्ग उत्साहात पार पडला. यावेळी कृषीतज्ञ डॉ. दादा लाड यांचे मार्गदर्शन लाभले; तसेच पद्मश्री सन्मान प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.भारत कृषीप्रधान देश असून शेतकरी हा अन्नसाखळीचा केंद्रबिंदू असल्याचे अधोरेखित … Read more

गोवंश जनावरांची दाटीवाटीने वाहतूक;एकावर गुन्हा दाखल वाहनासह जनावरे जप्त

वाशी,दि.१९ (प्रतिनिधी) : गोवंश जनावरांची क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने व निर्दयीपणे वाहतूक करत कत्तलीसाठी नेत असल्याप्रकरणी एका विरोधात वाशी पोलिसात स्थानिक गुन्हे शाखेचे दयानंद गादेकर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे बुधवार ता.१८ रोजी रात्री १० वाजणेच्या सुमारास फक्राबाद ता.वाशी येथील मुख्य चौकातुण बबन घोडे वय ३७, रा. भोनगीरी, ता. भूम हा पांढऱ्या … Read more

शहरात मान्यवरांच्या उपस्थीतीत शिवजयंती उत्साहात साजरी

फोटो  : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थीत मान्यवर. वाशी, दि.१९ (प्रतिनिधी) : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव कमेटीच्या वतीने गुरुवारी (ता.१९) शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार विद्या राठोड, शिवसेना नेते … Read more

पोल वाकवल्याच्या संशयावरून मारहाण; दोघे जखमी, जिल्हा रुग्णालयात हलविले

वाशी, दि.१९ (प्रतिनिधी ) : शेंडी शिवारातील शेतातील पवनचक्कीच्या विद्युत लाईनचे पोल वाकवल्याच्या संशयावरून दोघांना लाकडी काठी व गजाने मारहाण केल्याची घटना गुरुवार (ता.१९) सकाळी साडेनऊच्या सुमारास शेंडी शिवारात घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून दोघांनाही पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या याबाबत मिळालेली माहिती अशी भारत नवनाथ मोरे व बाजीराव मोरे … Read more

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त व्याख्यानमाला; विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

फोटो : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनकार्यावरील पुस्तक व प्रतिमा शाळेस भेट देताना मान्यवर. एन. डी. नलवडेवाशी, दि. १७ (संपादक) : “शिक्षण, आरोग्य व समाजसेवेच्या माध्यमातून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणारे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे कार्य आजही मार्गदर्शक आहे,” असे प्रतिपादन प्रा. डॉ. दैवशाला रसाळ यांनी केले.प्राचार्य डॉ. अशोक कदम व समन्वयक प्रा. … Read more

वैचारिक पिढी घडवणे ही काळाची गरज : प्रा. डॉ. क्रांती मोरे

फोटो : धाराशिव ग्रथोत्सव प्रसंगी ‘राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन व कार्य’ या विषयावर आयोजीत परिसंवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. क्रांती मोरे. एन.डी.नलवडेवाशी, ता. १७ (संपादक) : महापुरुषांच्या केवळ जयंती-आरत्या करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे अधिक महत्त्वाचे असून समाजपरिवर्तनासाठी वैचारिक पिढी घडवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन साहित्यिक प्रा. डॉ. क्रांती मोरे यांनी केले. … Read more

️ शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचे ऐतिहासिक प्रदर्शन निलंग्यात

वाशी जि.धाराशिव – निलंगा येथे शिवकालीन पराक्रमाची साक्ष देणारी दुर्मिळ शस्त्रे आणि ऐतिहासिक वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. संग्रहक माधवराव उत्तमराव देशमुख यांच्या संग्रहील वाघनखे, दांडपट्टा तसेच अनेक ऐतिहासिक वस्तू इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.विद्यार्थी, संशोधक आणि शिवभक्तांसाठी हा उपक्रम प्रत्यक्ष इतिहास अनुभवण्याची सुवर्णसंधी ठरणार असून शिवकालीन शौर्याचा थरार अनुभवण्याची दुर्मीळ संधी उपलब्ध … Read more

एस.एल. पवार यांचा अमृतमहोत्सव ‘ग्रंथतुला’ उपक्रमाने उत्साहात

मा.श्री एस.एल. पवार (भाऊ) यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त त्यांच्या वजनाएवढ्या पुस्तकांची ग्रंथतुला करण्यात आली. यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.(फोटो सौजन्य – निसर्ग फोटो स्टुडिओ) वाशी : येथील अजिंक्य विद्या मंदिर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस.एल. पवार यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त सोमवारी (ता.१६) ग्रंथतुला उपक्रमासह विविध कार्यक्रम जल्लोषात पार पडले. त्यांच्या वजनाएवढ्या पुस्तकांची तुला करून ‘ज्ञानदानाचा प्रेरक संदेश … Read more

शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद७८ रक्तदात्यांचा सहभाग; समाजाभिमुख उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

वाशी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवारी (ता.१६) छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या समाजोपयोगी उपक्रमात ७८ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित केली.कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेच्या पूजनाने झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या … Read more

धाराशिव ग्रंथोत्सवाचा उत्साहपूर्ण समारोप; परिसंवाद व कवीसंमेलनाने रंगली सांगता

संपादक – एन.डी.नलवडे कवीसंमेलन प्रसंगी उपस्थित कवींची बहारदार उपस्थिती. वाशी: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव व तालुका ग्रंथालय समिती, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अजिंक्य विद्या मंदिर प्रांगणात आयोजित दोन दिवसीय ‘धाराशिव ग्रंथोत्सवा’चा समारोप रविवारी (ता.१५) उत्साहात झाला. १४ व १५ फेब्रुवारीदरम्यान पार पडलेल्या या ग्रंथोत्सवाला साहित्यप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.समारोप दिनाची सुरुवात ‘राजमाता अहिल्यादेवी … Read more

error: Content is protected !!