
वाशी, दि. २८ (प्रतिनिधी) : येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित छत्रपती शिवाजी विद्यालयातील इयत्ता सातवीच्या १४ विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये पात्रता मिळविली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या परीक्षेत कनक नलवडे हिने २१८ गुण मिळवत विद्यालयातुन प्रथम क्रमांक मिळवला आहे.माणस खटिंग याने २१२ गुण मिळवुण व्दीतीय तर राजवीर ढेपे याने १९८ गुण मिळवुण तृतीय क्रमांक मिळवला. तसेच अर्जुन पवार (१९०), आदित्य जगताप (१८०), प्राची मस्कर (१७६), सान्वी कुंभार (१७२), कृष्णाली टकले (१७०), अक्षरा जगताप (१६२), श्रीनिधी गपाट (१६२), शिवतेज घुले (१५४), श्वेधा काकडे (१५४), शिव विश्वेकर (१४४) व अक्षरा जाधव हिने (१३६) गुण मिळवत शिष्यवृत्ती परीक्षेत पात्रता मिळविली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, संस्थेचे संचालक तानाजी शिनगारे, मुख्याध्यापक सुहास थोरबोले, पर्यवेक्षक बापुसाहेब सावंत, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नेताजी नलवडे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्वजित देशमुख यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.