कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त व्याख्यानमाला; विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

फोटो : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनकार्यावरील पुस्तक व प्रतिमा शाळेस भेट देताना मान्यवर.

एन. डी. नलवडे
वाशी, दि. १७ (संपादक) : “शिक्षण, आरोग्य व समाजसेवेच्या माध्यमातून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणारे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे कार्य आजही मार्गदर्शक आहे,” असे प्रतिपादन प्रा. डॉ. दैवशाला रसाळ यांनी केले.
प्राचार्य डॉ. अशोक कदम व समन्वयक प्रा. शाम डोके यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या वतीने मामांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त २४ व्या विशेष व्याख्यानमालेअंतर्गत येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अभय वाघोलीकर होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना प्रा. डॉ. रसाळ यांनी मामांच्या जीवनकार्याचा सखोल आढावा घेत शिक्षण प्रसार, ग्रामीण भागातील आरोग्य जनजागृती आणि समाजोन्नतीसाठी त्यांनी केलेल्या निस्वार्थ कार्याचा प्रभावी ऊहापोह केला. वंचित व दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी उभारलेली शैक्षणिक चळवळ आजच्या पिढीस प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजहिताचा ध्यास घेत शिक्षणासोबत आरोग्यविषयक जागृती घडवून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिलेले त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. छाया नखाते, प्रा. आश्विनी नवले, प्रा. प्रियंका गाढवे, प्रा. पूजा लोखंडे, प्रा. डॉ. चेतना जगताप, संतोष मोळवणे, समाधान पवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. साधना तांबे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. शिंदे यांनी तर आभार सारिका गादेकर यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी  मामांच्या जीवनकार्यावरील पुस्तक व प्रतिमा शाळेस भेट देण्यात आली.

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनकार्यावरील व्याख्यान कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यासमेवत मान्यवर.

Leave a Comment

error: Content is protected !!