
फोटो ओळ – नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण प्रसंगी
तहसिलदार प्रकाश म्हेञे,एनडीआरएफ-एसडीआरएफचे अधिकारी,जवान व कारखानदार,कामगार आदी.
वाशी,दि.२५ (प्रतिनिधी) तेरखेडा ता.वाशी येथील प्रिन्स फायर वर्क्स कारखान्याच्या परिसरात बुधवार (ता.२५)
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. एनडीआरएफ पुणे व एसडीआरएफ धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रकाश म्हेत्रे होते. प्रमुख पाहुणे म्हणून एनडीआरएफ पुणेचे प्रमुख अधिकारी राहुलकुमार रघुवंश, एसडीआरएफ धुळेचे पोलीस उपनिरीक्षक शंकर उकंडे,पोलीस निरीक्षक भालेराव उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान विविध नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी तातडीने करावयाच्या उपाययोजनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले. रक्तस्त्राव कसा थांबवायचा, जखमी रुग्णाला सुरक्षितपणे कसे उचलायचे, उपलब्ध साधनांमधून तात्पुरती स्ट्रेचर कशी तयार करायची, गॅसची आग कशी विझवायची, अचानक झटका आल्यास हृदय-श्वसन पुनरुज्जीवन (सीपीआर) कसे द्यावे यासह अनेक महत्त्वपूर्ण बाबींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्वतःला आग लागल्यास जमिनीवर लोळून आग विझवण्याची पद्धतही दाखविण्यात आली.
या उपक्रमासाठी कारखाना संघटनेचे अध्यक्ष फरीद पठाण यांनी सहकार्य केले. प्रशिक्षण अतिशय सोप्या व प्रभावी पद्धतीने दिल्याबद्दल उपस्थितांनी पथकांचे कौतुक केले.
या कार्यक्रमास तेरखेडा व परिसरातील जवळपास कारखानदार, मजूर व कामगार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी तेरखेडा मंडळातील ग्राम महसूल अधिकारी पालके, गायकवाड, सावंत, मस्के, सुप्रिया भोसले, अनुराधा देशमुख, मंडळाधिकारी ढवारे तसेच महसूल सेवक खोत, आलम सय्यद व श्री बळवंत यांनी विशेष परिश्रम घेतले.