
फोटो – सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्याच्या सत्कार प्रसंगी एस.एल.पवार,एम.एन.माने यांच्यासह उपस्थीत शिक्षक.
वाशी,दि.०४ (प्रतिनिधी) येथील अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिरच्या तीन विद्यार्थ्यानी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश मिळवले असुन फेब्रुवारी महिन्यात झालेल्या या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.या यशामुळे परिसरात शाळेसह विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शाळेतील धवलसिंह दत्तात्रय कवडे याने ३०० पैकी तब्बल २६८ गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत चमकदार कामगिरी केली आहे. तसेच सोहमराजे रामहरी जगदाळे (२२८ गुण) आणि श्रेया विश्वनाथ विश्वेकर (१३९ गुण) मिळवुण एस.एस. तसेच एन.एस.एस. प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या तिन्ही विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.यश मिळवलेल्या तीनही विद्यार्थ्याचा संस्थेच्या वतीने बुधवार (ता.चार) शाळेत सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. एल. पवार,मुख्याध्यापिका एम.एन.माने,स्वप्नाली माने,पल्लवी क्षिरसागर यांच्यासह शिक्षक,शिक्षिकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक आदींची उपस्थिती होती.