
फोटो – सभापती,उपसभापती निवडीनतंर शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवसेनेचे नुतन पं.स.सदस्य.
वाशी,दि.०६ (प्रतिनिधी) : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या प्रणिता प्रविण गायकवाड यांची तर उपसभापतीपदी नितिन रणदिवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवार (ता. ६) रोजी पंचायत समिती सभागृहात पिठासन अधिकारी, तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मध्यम प्रकल्प क्र.२, धाराशिव संतोष राऊत
यांच्या उपस्थितीत सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया पार पडली.
वाशी पंचायत समितीच्या सहा गणांपैकी पाच गणांत शिवसेनेचे सदस्य निवडून आले होते, तर एका गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या निवडून आलेल्या आहेत.
सभापतीपदासाठी प्रणिता गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तसेच उपसभापतीपदासाठी नितिन रणदिवे यांचाही एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचीही बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
पिठासन अधिकारी संतोष राऊत यांनी दोघांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. निवडीनंतर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी आनंद व्यक्त करत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी गटनेते नागनाथ नाईकवाडी,नगरसेवक शिवहार स्वामी,युवासेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले,तालुका प्रमुख अँड.सत्यवान गपाट,जि.प.सदस्य विकी चव्हाण,आश्विनी उंदरे,विकास तळेकर,सुनिल उंदरे,दिनकर शिंदे,प्रकाश शेटे आदिंची उपस्थीती होती.
निवडीनंतर पंचायत समिती परिसरात समर्थकांनी फटाके फोडून व पुष्पगुच्छ देऊन आनंदोत्सव साजरा केला.
कोट
आ.प्रा.डाँ.तानाजीराव सवंत साहेब,भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हा.चेअरमन केशव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पंचायत समितीमार्फत विकासकामांना गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न तसेच सर्व सदस्यांना सोबत घेऊन तालुक्याच्या विकासासाठी पुढील काळात काम करणार आहे.
प्रणिता प्रविण गायकवाड
नुतन सभापती पंचायत समिती वाशी.