आ. प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात;तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पुण्यात सत्कार

फोटो – वाढदिवसानिमित्त आ.प्रा.डाँ.तानाजी सावंत यांचा सत्कार करताना शिवसेनेचे जि.प.गटनेते विकी चव्हाण.व उपस्थीत पदाधिकारी कार्यकर्ते.

एन.डी.नलवडे

वाशी, दि.१६ (संपादक): माजी मंत्री व भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा वाढदिवस रविवारी (ता.१५) तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. अनेक ठिकाणी रुग्णांना फळे वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच लहान मुलांना खाऊचे वितरण करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त वाशी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने पुणे येथे उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी आ. प्रा. डॉ. सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुष्पगुच्छ व शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी धाराशिव जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते विकी चव्हाण, वाशी नगरपंचायतीचे गटनेते नागनाथ नाईकवाडी, उपतालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास तळेकर, सुनील उंदरे, युवासेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, नगरसेवक शिवहार स्वामी, बालाजी घोलप, माजी सरपंच अशोक लाखे, सरपंच समाधान मोटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आ. प्रा. डॉ. सावंत यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पुणे येथे झालेल्या या सत्कार सोहळ्यामुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Comment

error: Content is protected !!