पारगाव येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा उत्साहात शुभारंभ

फोटो  – हरभरा हमीभाव केंद्राच्या उदघाटण प्रसंगी मान्यवर.

वाशी,दि.२१ (प्रतिनिधी) : पारगाव ता.वाशी येथे केंद्र  हरभरा हमिभिव खरेदी केंद्राचा शनिवार (ता. २१) रोजी शुभारंभ करण्यात आला.आ.प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व  भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हा.चेअरमन केशव सावंत यांच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या या हमीभाव केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
शनेश्वर कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित, वाशी-पारगाव’ यांच्या वतीने हे हमीभाव खरेदी केंद्र चालवण्यात येणार असून शेतकऱ्यांनी नोंदणी करून हरभरा हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी आणावा असे आवाहाण करण्यात आले आहे.
यावेळी  युवासेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले,जिल्हा परिषद सदस्या सविता तळेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर, ग्रामपंचायत सदस्या अंजली समाधान मोटे, समाधान मोटे, अ‍ॅड. प्रवीण गाडे, पोपट सुरवसे, महेश आटोळे, अशोक जाधव, सीताराम कुलकर्णी, कांतीलाल पाटील, महावीर चोरडिया, संभाजी मुळे, चेतन तातुडे, बाबा हारे, तानाजी कोकाटे, रामदास खारतोडे, बाबू अण्णा मोटे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!