पारगाव येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत  ‘पहिलीचा प्रवेशोत्सव’ उत्साहात

फोटो – पारगाव ता.वाशी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिलीच्या प्रवेशोत्सव कर्यक्रम प्रसंगी डाँ.सुधीर आखाडे,सविता तळेकर यांच्यासह उपस्थीत मान्यवर,पालक,विद्यार्थी.


वाशी,ता.०१ (प्रतिनिधी) पारगाव ता.वाशी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सोमवार ता.३० रोजी
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला. ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ तसेच ‘गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा’ या संदेशांनी शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रेरणादायी पद्धतीने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीधर आखाडे होते. जिल्हा परिषद सदस्या सविता तळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मीख्याध्यापक एकनाथ मोटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सलीमभाई शेख,डॉ. श्रीधर आखाडे,विठ्ठल मोटे,विकास तळेकर,लहू चव्हाण,डॉ.अनंत कुलकर्णी,नवनाथ आखाडे, बालाजी गिराम, सुरेश लाखे, श्री जाधव, गोपाळ देशपांडे, दिलशाद शेख, भगवान गायकवाड आदीसह  पालक,मता पालक उपस्थीत होते.
कार्यक्रमप्रसंगी नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या स्वरांजली अमोल आखाडे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच विठ्ठल मोटे,डॉ.श्रीधर आखाडे यांच्या वतीने तिला १,००१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
शाळेत प्रथमच दाखल होणाऱ्या चिमुकल्यांचे गुलाबपुष्प व गोड खाऊ देऊन स्वागत करण्यात आले.
मुख्याध्यापक एकनाथ मोटे यांनी मार्गदर्शन करताना शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम, सुविधा आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली.
“शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी आवश्यक त्या सर्व बाबी प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील,” असे आश्वासन सविता तळेकर यांनी यावेळी दिले.

Leave a Comment

error: Content is protected !!