निवडणूक विभागाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण१० टेबलांवर ९ फेऱ्यांत उद्या होणार मतमोजणी प्रक्रिया

वाशी,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून, निवडणूक विभागाने मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. आज (ता.०९) रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, ही प्रक्रिया एकूण १० टेबलांवर नऊ फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे.
मतमोजणीसाठी आवश्यक असलेली यंत्रणा, कर्मचारी व सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली असून, मतमोजणी केंद्र परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक टेबलावर नियुक्त कर्मचाऱ्यांना मतमोजणी संदर्भातील स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडेल यासाठी दक्षता घेतली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या तीन गटांसाठी तसेच पंचायत समितीच्या सहा गणांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. प्रत्येक फेरीनंतर निकालाची नोंद घेऊन पुढील फेरीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन सज्ज असून, अधिकृत प्रतिनिधी व माध्यम प्रतिनिधींनाच केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असून, कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.दरम्याण उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी संतोष राऊत सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तहसिलदार प्रकाश म्हेञे,निवडणुक विभागाचे नायब तहसिलदार डी.जे.शिंदे,पुजा पाटील,विद्या राठोड,श्री सांगळे हे मतदान मोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेऊन आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!