शिवजन्मोत्सवानिमित्त सातदिवसीय ‘शिवआरोग्य सप्ताह’ शिबिराचे आयोजन

शिवजन्मोत्सवानिमित्त सातदिवसीय ‘शिवआरोग्य सप्ताह’ शिबिराचे आयोजन.
वाशी, (प्रतिनिधी):
शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून वाशी तालुका व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी श्री विठ्ठल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पार्डी फाटा यांच्या वतीने दि. १६ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सात दिवसीय मोफत ‘शिवआरोग्य सप्ताह’ शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन शिबीरासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहाण संचालक सुरेश डांगे यांनी केले आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये हाडांचे आजार, हृदयविकार, बी.पी., मधुमेह (शुगर), थायरॉईड, दमा व छातीचे विकार, पोटाचे आजार, किडनी व मुतखड्याचे विकार, लिव्हरचे विकार, गुडघा व मनक्याचे विकार, मुळव्याध व भगंदर, विविध अ‍ॅलर्जी, बालरोग, महिलांचे आजार, सर्दी-ताप-खोकला तसेच चरबीच्या गाठी यासह विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.
शिबिराच्या कालावधीत बी.पी. व साखर तपासणी तसेच ई.सी.जी. तपासणी पूर्णतः मोफत करण्यात येणार असून रक्त व लघवी तपासण्यांवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच सोनोग्राफी तपासणीवर ३० टक्के, तर एक्स-रे तपासणीवर ५० टक्के सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांसाठी अ‍ॅडमिट केल्यास मोफत उपचारांची सुविधा देखील देण्यात येणार आहे.
याचबरोबर शिबिरात नागरिकांसाठी विविध तपासण्या अत्यल्प दरात तसेच फुल बॉडी चेकअप केवळ ११९९ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
या शिबिरात डॉ. सुधीर गंगाधर (M.B.B.S.), फॅमिली फिजिशियन, कन्सल्टिंग फिजिशियन तसेच हृदयरोग, डायबेटीस व थायरॉईड तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.
श्री विठ्ठल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे ३० बेडचे सुसज्ज व आधुनिक हॉस्पिटल असून ६ बेडचे अतिदक्षता (आय.सी.यु.) विभाग, २४ तास अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल, एक्स-रे, ई.सी.जी., सुसज्ज ऑपरेशन थिएटर, कॅशलेस सुविधा, व्हेंटिलेटर व मॉनिटर यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या रुग्णालयात आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार सुविधा उपलब्ध असून शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन वाशी तालुका व परिसरातील नागरिकांना करण्यात आले आहे.
ठिकाण: एन.एच. ५२, पार्डी फाटा, ता. वाशी
संपर्क: 7020908466 / 8449155119

Leave a Comment

error: Content is protected !!