धाराशिव ग्रंथोत्सव २०२५: ज्ञान व संस्कृतीचा मेळावा १४–१५ फेब्रुवारी रोजी होणार वाशीला.

(फोटो – प्रतिकात्मक)

एन.डी.नलवडे

वाशी,ता.१२ (संपादक) धाराशिव: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व तालुका ग्रंथालय संघ, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने अजिंक्य विद्या मंदीर प्रांगणात १४ व १५ फेब्रुवारी रोजी धाराशिव ग्रंथोत्सव २०२५ आयोजित करण्यात आला आहे.
ग्रंथोत्सवात ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन व विक्री तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व परिसंवाद या विविध उपक्रमांचा समावेश असेल. सदरच्या कार्यक्रमाद्वारे नागरिक आणि ग्रंथप्रेमींना ज्ञानाचा आणि संस्कृतीचा आनंद अनुभवता येईल, असा आयोजकांचा विश्वास आहे.
ग्रंथोत्सव समन्वय समितीने सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. समितीच्या म्हणण्यानुसार हा कार्यक्रम सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ज्ञान आणि संस्कृतीचा मेळावा ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!