पोल वाकवल्याच्या संशयावरून मारहाण; दोघे जखमी, जिल्हा रुग्णालयात हलविले

वाशी, दि.१९ (प्रतिनिधी ) : शेंडी शिवारातील शेतातील पवनचक्कीच्या विद्युत लाईनचे पोल वाकवल्याच्या संशयावरून दोघांना लाकडी काठी व गजाने मारहाण केल्याची घटना गुरुवार (ता.१९) सकाळी साडेनऊच्या सुमारास शेंडी शिवारात घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून दोघांनाही पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या याबाबत मिळालेली माहिती अशी भारत नवनाथ मोरे व बाजीराव मोरे दोघे रा. शेंडी यांना पवनचक्कीचे पोल वाकवल्याच्या संशायावरुन  राजकुमार शिंदे व अनंता  मोरे दोघे रा. शेंडी यांनी जबर मारहाण मारहाण केली.या घटणेननतंर जखमीना वाशी येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचारानतंर दोघानाही पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.सदर घटना भारत मोरे हे शेतात जनावरे चारण्यासाठी घेऊन जात असताना झाल्याची माहिती आहे.
मारहाणीत भारत मोरे यांच्या डाव्या पायाला जबर मार बसला असून पाय फ्रॅक्चर असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.तर बाजीराव मोरे यांना जबर मुका मार लागलेला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन जणांनी मारहाण केल्याचे सांगितले जात असले, तरी जखमींच्या म्हणण्यानुसार तिघांनी मिळून मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे.जखमीनी वाशी पोलीसात तक्रार दिली असुन घटनेचा अधिक तपास सुरू असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया राञी उशीरापर्यत सुरू होती.
……..
शेंडी ता.वाशी येथे यापूर्वीही पवनचक्कीच्या कामांशी तसेच शेतातून गेलेल्या पोलच्या मोबदल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर शेडी येथील सरपंचासह शेतकऱ्यांला मारहाण झाली होती.याच पाश्वभुमीवर  संबंधित कामांबाबत मोबदला, नुकसानभरपाई व हक्क यावरून वेळोवेळी वाद निर्माण होत असल्याचे चित्र असून, याच पार्श्वभूमीवर आजची घटना घडल्याची चर्चा गावात सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!