वाशी,दि.२४ (प्रतिनिधी) : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवुण सहा जाणांची एकुण ११ लाख ८५ हजार रुपयाची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असुन
मंगळवार (ता.२४) रोजी बाळासाहेब पंडितराव सुकाळे यांच्या फिर्यादीवरुन चौघा विरोधात वाशी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी रईसोद्दीन (नबाब) हमीद काझी रा.वाशी यांनी व संदीप चंद्रकांत चांदीएकर, स्वप्निल मोरे व सनी पूर्ण नाव माहित नाही तिघे रा. मुंबई यांनी वाशी येथील सहा जणांकडून सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनरोख रक्कम,फोन पे नंबरवर तसेच बँक खात्यावर एकुण १५ लाख रुपये घेऊन संबधीताना खोटे नेमणूक पत्र देऊन विश्वासघात केला. माञ नोकरी न लागल्याने दिलेल्या पैशाची मागणी केली असता १५ लाखांपैकी ३ लाख १५ हजार रुपये परत केले माञ राहिलेल्या ११ लाख ८५ हजार रुपयाची मागणी केली असता पैसे देण्यास धमाकावून टाळाटाळ करून फसवणूक केली असल्याची तक्रार बाळासाहेब पंडितराव सुकाळे यांनी वाशी पोलिसात दिल्यावरून पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांचे आदेशावरून दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजयसिंह भाळे हे करीत आहेत.