वाशी,दि.१७ (प्रतिनिधी) : वाशी फाटा त.वाशी परिसरातील गायरान जागेत नविन वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू असताना ठेकेदार महिलेकडून सहा लाख रुपयांची खंडणी मागत मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेलि माहिती अशी, शोभा धोंडिराम जाधव वय ४३, रा. कैकाडी गल्ली, मंडई पेठ, परंडा या १४ एप्रिल रोजी सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान वाशी फाट्याजवळील गायरान जागेत वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम करीत होत्या. त्यावेळी राजू माने व पांडुरंग माने यांनी त्यांच्याकडे सहा लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी जाधव यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच इतरांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत जाधव यांच्याकडील दोन मोबाईल तसेच जेसीबी ऑपरेटर मनोज धनवे याच्याकडील एक मोबाईल हिसकावून नेण्यात आला. धनवे यालाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी पांडुरंग लक्ष्मण माने, राजू लक्ष्मण माने, मारुती नागनाथ माने, नाना अकुंश माने,सलमान पठाण सर्व रा. भूम, व अजिज मुजावर यांचा जेसीबी ऑपरेटर अशा सहाजणांविरुद्ध वाशी पोलीसात १६ एप्रिल रोजी मध्यराञी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनिवास सावंत हे करत आहेत.