
फोटो – मंथन परिक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्याच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यासह मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार व शिक्षक.
……………………………
वाशी, दि.१९ (प्रतिनिधी): येथील अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यानी मंथन टॅलेंट सर्च परीक्षेत मोठे यश संपादन करत राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे
शाळेच्या नावलौकीकात भर पडली असुन विद्यार्थ्याचे सर्वञ कौतुक होत आहे.
मंथध परिक्षेत राज्यस्तरावर इयत्ता पहिलीतील मोहम्मद अहे्फाज अमजत तांबोळी याने १५० पैकी १४२ गुण मिळवत राज्यात पाचवा क्रमांक पटकावला. इयत्ता दुसरीतील रिद्धी रमेश माने हिने १४४ गुणांसह राज्यात चौथा क्रमांक मिळवला.
जिल्हास्तरावर इयत्ता पहिलीतील आदित्य अतुल पवार व अक्षरा रवींद्र जोंधळे यांनी प्रत्येकी १३४ गुणांसह जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवला.
तालुका व केंद्रस्तरावरही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. इयत्ता पहिलीतील प्रसाद बालाजी निकम (१२० गुण) याने तालुक्यात तिसरा व केंद्रात दुसरा क्रमांक मिळवला. दक्ष सचिन देशमुख, कुंजल किरण लोकरे, तोहीत अनस मुजावर व सान्वी निलेश थोरात यांनी ११८ गुणांसह तालुक्यात चौथा व केंद्रात तिसरा क्रमांक मिळवला. तसेच मनवा मनोज चौधरी (११६ गुण) व कादंबरी विकास थोरबोले (११४ गुण) यांनीही अनुक्रमे पाचवा व सहावा क्रमांक मिळवत यश संपादन केले.
इयत्ता दुसरीत श्लोक दत्ता भारती व समृद्धी दत्ता चौधरी यांनी १२६ गुणांसह तालुका व केंद्रात तिसरा क्रमांक मिळवला. यशश्री बाबुराव भैरट व शिवम जयराम मोळवणे यांनी १२४ गुणांसह चौथा, तर सई चंद्रकांत उंदरे व अंश मनोज येताळ यांनी १२० गुणांसह सहावा क्रमांक मिळवला.
इयत्ता तिसरीत संस्कार सचिन नाळपे याने २४८ गुण मिळवुण तालुक्यात तिसरा व केंद्रात पहिला क्रमांक मिळवला. संध्या राजकुमार हजारे हिने (२४६ गुण घेऊन तालुक्यात चौथा व केंद्रात दुसरा क्रमांक पटकावला. तसेच अन्वित रणजित बिडवे व कल्पेश किरण गपाट (२३८गुण) यांनी केंद्रात पाचवा, तर विराज संजय कवडे (२३२ गुण) याने सातवा क्रमांक मिळवला.
इयत्ता पाचवीत धवलसिंह दत्तात्रय कवडे याने २७० गुण घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. इयत्ता सहावीतील शुभ्रा मनोज कुलकर्णी २१२ गुण व रेणुका राजकुमार हजारे २०८ गुण यांनी केंद्रात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्स्थेचे संस्थापक अध्यक्ष एस.एल.पवार,मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार,मनिषा माने यांनी अभिनंदन केले आहे.