छत्रपती शिवाजी विद्यालयातील  गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ७५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकांसह ट्रॉफी व प्रमाणपत्रांचे वितरण

फोटो  : गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात मान्यवरांसह सन्मानित विद्यार्थी.


वाशी, दि. २८ (प्रतिनिधी) : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मंगळवारी (दि. २८) कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी  गुणवंत विद्यार्थ्यांचा ७५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकांसह ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन पालकांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगर येथील डॉ. विवेकानंद चेडे तसेच जर्मनी येथे आयटी अभियंता म्हणून कार्यरत असलेले ज्ञानदेव गरड उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

सई डिसले – प्रथम क्रमांक १०० टक्के गुण

यंदाच्या दहावीच्या परीक्षेत सई डिसले हिने १०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. प्रज्ञा डोरले हिने ९९.२० टक्के गुणांसह द्वितीय, तर कुंजल नलवडे हिने ९९ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. तसेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह एनएमएमएस, नवोदय व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

प्रज्ञा डोरले – व्दितिय क्रमांक ९९.२० टक्के गुण


यावेळी पी. टी. पाटील, डॉ. विवेकानंद चेडे आणि जयकुमार शितोळे यांनी विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसोबत संस्कार, सातत्य आणि परिश्रम यांची कास धरावी, असे सांगत त्यांच्या यशाचे कौतुक केले.
कार्यक्रमास नगराध्यक्षा विजयाबाई गायकवाड, संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, मुख्याध्यापक सुहास थोरबोले, संतोष माने, दत्तू घुमरे, पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्वजीत देशमुख, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष नेताजी नलवडे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुंजल नलवडे – तृतिय क्रमांक ९९.०० टक्के गुण


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुहास थोरबोले यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय रुपाली गिरी यांनी करून दिला. सूत्रसंचालन जी. एम. देशमुख, एस. एस. धारकर आणि सुनील क्षीरसागर यांनी केले.

Leave a Comment

error: Content is protected !!