सुंदर परिसर, स्वच्छ परिसर’ उपक्रमातून महाविद्यालयाची स्वच्छता

फोटो – कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात
सुंदर परिसर, स्वच्छ परिसर उपक्रम प्रसंगी प्राध्यापक,कर्मचारी,विद्यार्थी.


वाशी,दि.०८ (प्रतिनिधी) : येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात ‘सुंदर परिसर, स्वच्छ परिसर’ या  सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत शनिवार ता.आठ रोजी परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
महाविद्यालयाच्या परिसरातील विविध भागांची स्वच्छता करून कचरा संकलित करण्यात आला. या वेळी प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी श्रमदान केले.

यावेळी प्राचार्य डॉ. कोठावळे म्हणाले, ‘‘विविध शाळा, संस्था तसेच स्थानिक पातळीवर सातत्याने स्वच्छता मोहिमा राबवून परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे आवश्यक आहे. शैक्षणिक संस्थेचा परिसर स्वच्छ असेल तर ज्ञानदानाच्या कार्यासाठीही सकारात्मक वातावरण निर्माण होते. सार्वजनिक ठिकाणे व रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.’’
महाविद्यालयात यापुढेही ठराविक कालावधीनंतर परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!