दसमेगावात सामाजिक ऐक्याचे दर्शन; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

फोटो – दसमेगाव ता.वाशी येथे डाँ.बासाहेब आंबेडकर
यांची जयंती उत्साहात साजरी.यावेळी पोपट मोरे, रणजित पाटील,दादासाहेब लगाडे आदी.


वाशी,दि.०१ (प्रतिनिधी) दसमेगाव ता.वाशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात व सामाजिक सलोख्याच्या वातावरणात बुधवार (ता.२९) साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावात विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवारी शिवशाहीर बंडू खराते यांचा शाहिरी जलसा रंगला. तसेच परांडा तालुक्यातील आलेश्वर येथील गायक शोहेल मुलानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भीमगीतांनी उपस्थितांना भारावून टाकले.
बुधवारी सकाळी नऊ वाजता बौद्धविहार येथे मान्यवरांच्या ईपस्थीतीत  सरपंच पोपट मोरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध व आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून महामानवांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच पोपट मोरे, उद्योजक रणजित पाटील, शशिकांत मोरे,पञकार दादासाहेब लगाडे,श्रीकांत मोरे, बाळासाहेब उघडे, शिवाजी उगडे, अनिकेत मोरे, इस्माईल शेख, विजय खंडागळे, बंडू उगडे यांच्यासह जयंती समितीचे अध्यक्ष अनिल लगाडे, बौद्ध बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायंकाळी सहा वाजता गावातून सजवलेल्या रथातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये ही मिरवणूक उत्साहात पार पडली.
या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. त्यामुळे दसमेगावात सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडले.

Leave a Comment

error: Content is protected !!