
फोटो – माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ कार्यशाळेप्रसंगी केशव सावंत,प्रनिता गायकवाड,नितिन रणदिवे,आश्विनी उंदरे,सविता तळेकर आदी.
वाशी, दि.०२ (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या अनुषंगाने शनिवार ता.०२ रोजी तालुकास्तरीय कार्यशाळा तहसील कार्यालयात पार पडली.आ.प्रा.डाँ.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हा.चेअरमन केशव सावंत हे होते.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती प्रणिता प्रवीण गायकवाड, उपसभापती नितीन रणदिवे, जिल्हा परिषद सदस्य अश्विनी सुनील उंद्रे,सविता विकास तळेकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्रकर,पंचायत समिती सदस्य अशोक भराटे,अरुणा रावसाहेब शिंदे,सुनिल उंदरे,प्रविण गायकवाड,विकास तळेकर,उध्दव साळवी यांच्यासह ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी तसेच विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केशव सावंत यांनी आरोग्य जनजागृती, नियमित तपासणी शिबिरे, स्वच्छता राखणे, सुधारित जीवनशैलीचा अवलंब, तसेच माता-बाल आरोग्य आणि मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारावर वेळेत उपचार होण्यासाठी इवश्यक उपाययोजनासंबधी मार्गदर्शन केले.तसेच तालुक्यातील प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.