हर्बल अँटीकोविड संशोधनासाठी सुमेध चव्हाण यांना पीएच.डी.


वाशी, दि. २४ (प्रतिनिधी) : विझोरा ता.वाशी येथील रहिवासी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील संशोधक डॉ. सुमेध सुनील चव्हाण यांनी हर्बल अँटीकोविड फॉर्म्युलेशन्सवरील संशोधन यशस्वीरित्या पूर्ण करून पीएच.डी पदवी संपादन केली आहे.
“स्टडीज ऑन इफिकसी ऑफ सम हर्बल अँटीकोविड-१९ फॉर्म्युलेशन्स” या विषयावरील त्यांचे संशोधन वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. अरविंद धाबे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. संशोधनात बावीस विविध औषधी वनस्पतींपासून तयार करण्यात आलेल्या हर्बल फॉर्म्युलेशन्सच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांचा तसेच SARS-CoV-2 सूडोविरिऑन विषाणूविरुद्ध त्यांच्या संभाव्य परिणामकारकतेचा अभ्यास करण्यात आला.
या संशोधनातून काही हर्बल फॉर्म्युलेशन्समध्ये कोविड-१९ विरोधी उपयुक्त गुणधर्म असल्याचे निष्पन्न झाले असून, भविष्यातील हर्बल औषध संशोधनासाठी हे निष्कर्ष दिशादर्शक ठरू शकतात. डॉ. चव्हाण यांनी यापूर्वी एम.एस्सी. पदवीमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले असून, संशोधन क्षेत्रातील ही आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे.
डॉ. सुमेध चव्हाण यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व संशोधन क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!