छत्रपती शिवाजी विद्यालयाचे इंडियन टॅलेंट ऑलिंपियाडमध्ये मोठे यश

फोटो : छत्रपती शिवाजी विद्यालयात ऑलिंपियाड परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना सुहास थोरबोले, बापुसाहेब सावंत, सुनील क्षीरसागर आदी.


वाशी, दि. २३ (प्रतिनिधी) : येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलिंपियाड या आंतरराष्ट्रीय परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी १४ सुवर्ण, १० रौप्य आणि १० कांस्य अशी एकूण ३४ पदके पटकावत शाळेच्या नावलौकिकात भर घातली. या यशस्वी विद्यार्थ्यांचा बुधवार (ता. २२) रोजी शाळेत सत्कार करण्यात आला.
इंग्रजी ऑलिंपियाडमध्ये इयत्ता सहावीतील जयराज देशमुख (सुवर्ण), आर्यवीर काळे (रौप्य) व चारुलता डोरले (कांस्य) यांनी यश मिळवले. सातवीतील कनक नलवडे हिने राज्यात १९वा क्रमांक पटकावत ‘एक्सलंट अवॉर्ड’सह सुवर्ण पदक मिळवले. अक्षरा जाधव (रौप्य) व अक्षरा जगताप (कांस्य) यांनीही यश संपादन केले.

आठवीतील संस्कृती जाधव हिने राज्यात आठवा क्रमांक मिळवत ‘एक्सलंट अवॉर्ड’ व ७०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली. श्रावणी शेळके (रौप्य) व काव्या घुले (कांस्य) यांनीही कामगिरी केली. नववीतील ईश्वरी सौताडेकर (सुवर्ण) तर दहावीतील विश्वजीत जाधव (राज्य १५वा, एक्सलंट अवॉर्ड) व सावरी मोरे (सुवर्ण) यांचा उल्लेखनीय सहभाग राहिला.
गणित ऑलिंपियाडमध्ये पाचवीतील प्राजक्ता कावळे हिने राज्यात तिसरा क्रमांक मिळवत ‘एक्सलंट अवॉर्ड’सह १२०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली. सहावीतील जयराज देशमुख (सुवर्ण), अंशुमन आवारे (रौप्य), प्रज्ञा माळवदे (कांस्य) यांनी यश मिळवले. सातवीतील सानवी कुंभार (सुवर्ण), दुर्वा गुंजाळ (रौप्य), शिव विश्वेकर (कांस्य) तर आठवीतील श्रावणी शेळके (सुवर्ण) यांनीही कामगिरी केली. नववीतील सिद्धी महाकळे (सुवर्ण), राणाप्रताप कवडे (रौप्य), मोहित शेरकर (कांस्य) तर दहावीतील कुंजल नलवडे (सुवर्ण), तनिष्क क्षीरसागर (रौप्य) व सई पवार (कांस्य) यांनी यश मिळवले.
सायन्स ऑलिंपियाडमध्ये सहावीतील आयुष डोईफोडे (सुवर्ण), आर्यन माळी (रौप्य), स्वराज ढेपे (कांस्य) यांनी यश मिळवले. नववीतील राणाप्रताप कवडे (सुवर्ण), आदिश्री देशमुख (रौप्य) व सिद्धी महाकळी (राज्य १६वा, एक्सलंट अवॉर्डसह कांस्य) यांनी कामगिरी केली. दहावीतील अर्जुन नाईकवाडी (सुवर्ण), कुंजल नलवडे (रौप्य) व समृद्धी गाढवे (कांस्य) यांनीही यश संपादन केले.
तर्कशक्तीवर आधारित परीक्षेत स्वराज ढेपे याने राज्यात १७वा क्रमांक मिळवत ‘एक्सलंट अवॉर्ड’सह सुवर्ण पदक पटकावले.
या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक सुहास थोरबोले, पर्यवेक्षक बापुसाहेब सावंत, ऑलिंपियाड विभागप्रमुख सुनील क्षीरसागर, श्री. रेपाळ, श्री. छबिले तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment

error: Content is protected !!